Barsu Refinery Project :6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? ,रिफायनरी समर्थक घेणार ठाकरेंची भेट :ABP Majha

६ मे रोजी बारसू रिफायनरीचा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यादरम्यानच महायुती समर्थन मोर्चा काढणार आहे.. ठाकरेंचं हेलिकॉप्टर जिथे लँड होणार आहे, त्याच हेलिपॅडपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.. उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि भाजप नेते प्रमोद जठार या मोर्चाचं नेतृत्व करतील.. य़ामुळे भाजप-शिवसेना कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोेर उभे ठाकणार आहेत.. आणि म्हणूनच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola