Pune Crime : पुण्यात 10 ते 12 जणांनी घेतला तरुणाचा जीव
Pune Crime : पुण्यात 10 ते 12 जणांनी घेतला तरुणाचा जीव पुण्यातील शिवाजी नगर परिसरात काल रात्री १० ते १२ जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. नितीन म्हस्के असं मृत तरुणाचं नाव आहे, काही दिवसांपूर्वी आरोपींसोबत नितीनचा वाद झाला होता. त्यात त्यानं एकावर हल्ला देखील केला होता. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी नितीनचा खून करण्याचा कट रचला. काल रात्री १ वाजता नितीन चित्रपट पाहून मंगला टॉकीजच्या बाहेर पडला, तिथं या १० ते १२ जणांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये नितीनचा जागीच मृत्यू झाला.