Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात?
Continues below advertisement
पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेत पदं न मिळाल्याने हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे 19 नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या नगरसेवकांचं बंड ठंड करण्यासाठी भाजपचं नेतृत्त्व सतर्क झाल्याचंही कळतं.
मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांना केली होती. पण याबाबत टाळाटळ करत निवड लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं कळतं.
Continues below advertisement