Maharashtra Traffic Fines | बेजबाबदार वाहन चालकांना 'ब्रेक'; राज्य सरकार आकारणार जास्तीचा दंड

Continues below advertisement

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांनी दंडाची रक्कम वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

इतकंच नव्हे, तर रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवं परमिट देणंही थांबवण्यात येणार असून, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram