Pune : नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालाय. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार जाहीर केला असून, पुरस्कार सोहळा १ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार आहे. दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वादाची ठिणगी पडलीय. काँग्रेस नेत्यांनी मोदींना पुरस्कार देण्याविरोधात आघाडी उघडलीय. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना तसं पत्र लिहिलंय. मोदी राहुल गांधीच्या विचारांना विरोध करतात. त्यामुळे मोदींना पुरस्कार देणं खेदजनक आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनीच मोदींना हा पुरस्कार देण्याचं सुचवलं होतं. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनाही निमंत्रण देण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे, शरद पवार यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात येणारेय. त्यामुळे, राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि राजकीय महानाट्यानंतर पहिल्यांदाच हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यताय. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या पुरस्कारावर काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात.