Pune Chinchwad Bypoll Election: कसबा , चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार? पोटनिवडणुकीचा निकाल काही तासांवर

अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं तयारी केली आहे.. चिंचवड मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे. पुण्यातला कसबा पेठ हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळणार की, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीत बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर राज्याला काही तासांत मिळणार आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या परिसरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यात मनाई करण्यात आली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola