Pune Housing Society | जाचक अटी लादणाऱ्या सोसायट्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा,सदस्यांचं म्हणणं काय?

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हाउसिंग सोसायटी यांना कडक इशारा दिला आहे. लाॅकडाऊन ५ मध्ये शासनाने काही निर्बंध शिथिल केले असतानाही काही सोसायट्या मात्र त्यांचे निर्बंध शिथिल करायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात अडवणूक होते आहे. पुण्यातील तिरुपती नगर सोसायटीमध्येही निर्बंध कायम आहेत. या सोसायटीमध्ये महिनाभरापूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्यांनी कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर तिथे कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. पण अजूनही निर्बंध कायम आहेत. 15 जूनपासून काही निर्बंध शिथिल करायचा त्यांचा विचार आहे. जसं की १५ जूनपासून घरकाम करणाऱ्या महिलांना परवानगी दिली जाऊ शकते. पण त्यांनाही काही नियमांचं पालन करावं लागेल असं सोसायटी सदस्य आणि बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठीच हे नियम बनवल्याचं या सोसायटीच्या कमिटी मेंबरने सांगितलं. पण ज्या वयोवृध्दांना अत्यावश्यक होती त्यांच्या मदतीनिसांना आम्ही परवानगी दिली असं या सोसायटीतकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola