Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोना, कॅबिनेटसह राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती

 महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. सोबतच ते 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने जे या बैठकीला आणि कार्यक्रमाला हजर होते त्यांच्यात भीतीचे वातावरण असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ बैठकीला आणि  राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर मंत्री तसेच अधिकारी यांची कोरोना चाचणी केली जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच आता पुढच्या कॅबिनेटवर देखील प्रश्न चिन्ह आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola