Pune Chandni Chowk : पूल पाडला, मार्ग मोकळा! तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरु ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर तब्बल ९ तासांनी ढिगारे हटवण्यात आले आणि वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरु करण्यात आलीय. रात्री १ वाजून ७ मिनिटांनी पूल पाडण्यात आला. त्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावरची वाहतूक सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी वाहतूक सुरु करण्यात आली. पूल पाडण्याआधी या चांदणी चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल ११ तास बंद असलेली वाहतूक अखेर सुरु करण्यात आली. त्यामुळे सातारा आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा झाला. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्यासाठीही ९ तासांचा वेळ लागला.
Continues below advertisement