Pune Chandani Chowk : नोएडातील ट्वीन टाॅवरप्रमाणे चांदणी चौकातील पूल उद्या रात्री पाडणार
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतींमध्ये स्फोटकं भरायचं काम सुरु झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दुपारी ४.३० वाजता चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत. रविवारी मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे. चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वापरलं जाणारं तंत्र नेमकं काय आहे, हे सांगताय इडिफीस इंजिनियरिंग कंपनीचे ब्लास्टिंग तज्ज्ञ आनंद शर्मा.