Pune Car Accident प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला न्यायालयीन कोठडी

Continues below advertisement

पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला (Pune Porsche Car Accident) आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.

विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram