Pune Car Accident Blood Test : अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉ. तावरेचा प्लॅन, मोठी माहिती उघड

Continues below advertisement

Pune Car Accident Blood Test : अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉ. तावरेचा प्लॅन, मोठी माहिती उघड

पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणी (Accident) आधी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता, 5 जूनपर्यंत पोलीस (Police) कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील (Sasoon) डॉक्टर आणि शिपायास 27 जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद केल्याचंही दिसून आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram