Pune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँग

Continues below advertisement

पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोर्शे कार भीषण अपघातातील (Pune accident) अल्पवयीन मुलास न्यायालयाने 15 तासांतच जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतरही 15 तासांत जामीन मिळाल्याने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली. बड्या बापाच्या बिघडेल पोराची ही मस्ती पाहिल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अखेर, दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी नव्याने अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी बाल हक्क मंडळाकडे केली. त्यानंतर, बाल हक्क मंडळाने 14 दिवसांसाठी त्यास बाल सुधारगृहात पाठवले आहे. मात्र, पैशाची मस्ती असलेल्या या मदमस्त पोराचा एक रॅप (Rap) व्हिडिओ आता समोर आला आहे. जामीन मिळाल्यानंतर त्याने हे रॅप बनवल्याचं त्या रॅपमधील शब्दांमधून दिसून येत आहे. किंचितही संवेदना नसलेल्या राक्षसी वृत्तीचा नमुना म्हणजेच हे रॅप असल्याचे दिसून येते. दरम्यान, ह्या रॅपचा व्हिडिओ डीपफेक आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात घटनेची तीव्रता पाहून काही राजकीय नेत्यांनी अपघाताची दखल घेत पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तर, सोशल मीडियातूनही संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे, वाढता दबाव लक्षात घेताच पोलीस खातंही अलर्ट झालं अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही थेट पुणे पोलिस आयुक्तालयात भेट दिली होती. त्यानंतर, पोलीस यंत्रणा पुन्हा जोरकसपणे कामाला लागल्याचं दिसून आलं. पोलिसांकडून नव्याने बाल हक्क मंडळाकडे दाद मागण्यात आली. त्यावेळी, मुलाचा जामीन रद्द करुन त्यास 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, जामीनावर सुटका झाल्यानंतर या मुलाने एक रॅप साँग बनवून पुन्हा एकदा पैशाची आणि श्रीमंतीची मस्ती दाखवून दिली आहे. बड्या बापाच्या या बाळाचा रॅप पाहून नेटीझन्स चांगलेच भडकले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram