Pune RTO : वाहनासकट दुचाकीस्वाराला Towing Van मध्ये भरलं! वाहनांवर कारवाईची ही कुठली पध्दत?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही करामत केली. संबंधित दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. ही घटना काल दुपारी घडली. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पुणे पोलिसांची अरेरावी करत असल्याचं म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.