Ratnagiri : निर्बंधांमुळे न खचता Social Media चा वापर करून कलाकारांनी प्रदर्शित केलं बाप्पाचं गाणं

Continues below advertisement

कोरोनाच्या काळात लोककला आणि लोककलावंताच्या व्यथा महाराष्ट्रानं पाहिल्या आणि ऐकल्या. कोरोनाचा फटका कोकणातील झाकडी, नमन आणि दशावताराच्या कलाकारांना देखील बसला. हाताला काम नाही आणि पैसा नसल्यानं जगण्याचा संघर्ष सुरू होता. पण, रत्नागिरी तालुक्यातील नरबे गावच्या झाकडी कलावंतांनी हार न मानता आपली गाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्यासाठी सर्व कलाकार एकत्र आले आणि त्यांनी स्टुडिओच्या माध्यमातून विविध प्रकारची गाणी रेकॉर्ड केली.शिवाय त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपसारख्या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. संकटात देखील संधी शोधत या कलाकारांनी नवीन माध्यम, तंत्रज्ञान आत्मसात केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram