Pune Banner On Bridge : 'सावधान नवले ब्रीज पुढे आहे, पुण्यातील बॅनरची सर्वत्र चर्चा
पुण्यातील नवले पूलावर अपघातांची मालिका थांबायचं नाव काही घेत नाहीये. अशातच "आमचा काही नेम नाही" अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुणेकरांनी आता प्रसिद्ध पुणेरी पाट्यांचा आधार घेतलाय.. आणि यावेळी ही पाटी लागली आहे, नवले पुलाजवळ.. "सावधान नवले ब्रीज पुढे आहे" आशा मजकुराचे बॅनर पुणेकरांनी या भागात लावले आहेत.... बॅनर वर लागलेले चित्र आणि मजकूर चर्चेचा विषय बनलाय. चार दिवसात नवले ब्रिजवर जवळपास पाच अपघात झाले आहेत.. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत. आता पुण्यातल्या पाट्या म्हटल्यावर त्याची चर्चा तर होणारच...