Pune Ambil Odha: पुणे महापालिका आंबिल ओढा परिसरात पुन्हा कारवाई करणार? स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय?
पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील बांधकामं हटवण्यावरील स्थगिती सत्र न्यायालयाने उठवलीय. विशेष म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करेपर्यंत तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास मनाई करण्यात यावी ही आंबील ओढा परिसरातील नागरिकांची मागणीही न्यायालयाने फेटाळलीय. त्यामुळे पुणे महापालिकेने ठरवल्यास आंबिल ओढ्यात बांधकामांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. २४ जूनला आंबिल ओढा पात्रातील अतिक्रमणं हटवण्याचा प्रयत्न झाल्यावर स्थानिकांकडून त्याला जोरदार विरोध झाला. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते.
Tags :
Pune News Latest Marathi News Abp Majha Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Pmc ABP Majha Pune Ambil Odha ABP Majha Video Murlighar Mohol