Pune African Parrot : लग्नाआधी भेट दिलेला आफ्रिकन पोपट परत दिला तरच घटस्फोट देईन; पतीची अट

Continues below advertisement

Pune African Parrot : लग्नाआधी भेट दिलेला आफ्रिकन पोपट परत दिला तरच घटस्फोट देईन; पतीची अट पती पत्नीच्या भांडणातून घटस्फोट झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकलंय. मात्र पोपटावरुन घटस्फोट मागितल्याचं पहिल्यांदाच ऐकलं असेल. पुण्यातील एका पतीने घटस्फोट मिळवण्यासाठी थेट पत्नीला भेट म्हणून दिलेला पोपट परत देण्याची अट घातलीय. घटस्फोटासाठी अर्ज केलेलं हे जोडपं सध्या अफ्रीकन पोपटामुळे चांगलंच चर्चेत आलंय. 2019 मध्ये पुण्यात या दोघांचा विवाह झाला होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पती-पत्नीमध्येे मतभेद झाले. यासंदर्भात दोघांनीही कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केलाय. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची सध्या वेगळी चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram