Pune : पुण्यात मांजरीमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 899 किलो बनावट पनीर साठा जप्त
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत... याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालंय... हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द इथल्या मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर छापा मारलाय.. यावेळी तब्बल २ लाखांचा ८९९ किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आलाय... बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय... सण उत्सव काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय...