Pune Accident Blood Sample : अल्पवयीन मुलाच्या मित्रांचेही ब्लड सॅम्पल बदलले? प्रकरण नेमकं काय?

Continues below advertisement

पुणे : शहरातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघातात डॉ.अजय तावरेने वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. अल्पवयीन मुलाचा ब्लड  सॅम्पल आणि अहवलात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलिस कोठडी (Police) सुनावली आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी अजय तावरेसह इतर दोघांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच, डॉक्टर तावरे याने सिनेस्टाईल प्लॅन रचून ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे, पुणे (Pune accident) अपघातानंतर डॉक्टरी पेशाला काळीमा फासण्याचं कामही या डॉक्टराकडून झाल्याचं दिसून येत आहे.  

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते.  त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले. मात्र, हे ब्लड सॅम्पल कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काल अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं नमूद केल्याचं समजतं. मात्र, आता पोलीस तपासातून आणखी वेगळीच माहिती समोर येत आहे. अजय तावरेने अगदी सिनेस्टाईल प्लॅन आखल्याचं दिसून येत आहे.

मिळते-जुळते तीन व्यक्तींचे नमुने

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला अणि त्याच्यासोबतच्या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी या तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने घ्यायचं ठरलं होतं. डॉक्टर अजय तावरेने या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी तसा प्लॅनच आखला होता. त्यानंतर त्या तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपशी ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना घेऊन ससुन रुग्णालयात पोहचले होते. त्यामुळे, आता पोलिस त्या तीन व्यक्ती कोण याचा शोध घेत आहेत. अजय तावरेच्या सांगण्यावरुन ब्लड ग्रुपशी मिळते जुळते सॅम्पल देण्यासाठी रुग्णालयात आलेले ते तिघे कोण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram