Pune: 76 वर्षाच्या आईची हत्या करुन 42 वर्षाच्या मुलाची आत्महत्या ABP Majha
७६ वर्षाच्या आईची हत्या करून ४२ वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या सहकारनगर परिसरात घडलीय. गणेश फरताडे असं आईची हत्या करून स्वतःचंही जीवन संपवणाऱ्या मुलाचं नाव आहे. हाताला काम नसल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं.. त्यांनी सुरुवातीला आईला औषधाचा ओव्हरडोस देऊन बेशुद्ध केलं. आणि चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीनं झाकून गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.