Vijay Wadettiwar on Corona : भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
कोरोनाची तिसरी लाट आलेली असून नागरिकांनी काळजी घेतली तर ठीक नाही तर भविष्यात विस्फोटक आणि गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेगावात दिला.ते नववर्षा निमित्त शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. तिसऱ्या लाटेत रुग्ण दुप्पट होण्याचा वेग एका दिवसाचा आताच आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे नाही तर लॉकडाउन अटळ असल्याचे संकेत त्यांनी दिले.