Pune : पुणे पोलीस आयुक्तालयासमोर एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं
Continues below advertisement
पुणे पोलीस आयुक्तालयासमोर एका ४० वर्षीय व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. सुरेश पिंगळे असं या व्यक्तीचं नाव आहे. पिंगळे हे पुण्यातल्या एआरडीए या शासकीय संस्थेत कंत्राटी पद्धतीनं काम करतात...दरवर्षी कंत्राटाचं नूतनीकरण करण्यासाठी त्यांना पोलिसांकडून गुन्हा नसल्याचं व्हेरिफिकेशन करुन घ्यावं लागतं. मात्र यंदा पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पोलिसांनी अडवणूक केल्याचा आरोप पिंगळे यांच्या पत्नीने केलाय. सुरेश पिंगळे नावाच्या व्यक्तीवर ३ गुन्हे दाखल असल्याचे सांगत पोलिसांनी अडवणूक केली आणि त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असा आरोप शामल पिंगळे यांनी केलाय. स्वतःला पेटवून घेतल्याने पिंगळे गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान शामल पिंगळे यांचे आरोप पोलिसांनी फेटाळलेत.
Continues below advertisement