PSI Somnath Zende Wins Dream 11 : ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकले दीड कोटी, पिंपरी चिंचवडमधील PSI ला लॉटरी

Continues below advertisement

PSI Somnath Zende Wins Dream 11 : ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकले दीड कोटी, पिंपरी चिंचवडमधील PSI ला लॉटरी

पुणे : कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. सध्या  देशात विश्वचषकाचे (ODI WORLD CUP 2023) वारे वाहत आहे. यंदा विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ड्रीम इलेव्हन (Dream11) या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपलं नशीब आजमावत असतात. या ड्रीम इलेव्हनमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला  नशीब उजळलं आहे. या क्रिकेटप्रेमी  उपनिरीक्षकाला (Pimpri- Chinchwad PSI)  तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे.   गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram