Pune College Reopen : पुणे जिल्ह्यात आज पासून सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठं आजपासून खुली होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होणार आहेत. महाविद्यालयं आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतू जो पर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडुन अधिकृत आदेश आल्या शिवाय कॉलेज सुरु करणार नसल्याचं काही शिक्षण संस्थानच्या प्रशासना कडुल सांगण्यात येत आहे.