Pune : पुण्यामध्ये विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी हैदोस घातलाय : ABP Majha
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी हैदोस घातलाय. कळस परिसरात गुंडांच्या एका टोळक्यानं हत्यारं नाचवत गोंधळ घातलाय. इतकंच नव्हे तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचीही या गुंडांनी तोडफोड करत दहशत माजवलेय. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्ती मध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने आणि टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. त्यामुळे एकंदरीतच विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झालाय की काय असा प्रश्न विचारला जातोय