Chandrashekhar Bawankule, Nagpur : पंतप्रधानांविरुद्ध षडयंत्र करणे हा देशद्रोह आहे! ABP Majha
मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालीय. पटोलेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत केलीय. तर याच मुद्यावरुन भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही असा पवित्रा बावनकुळेंनी घेतलाय.
दरम्यान बावनकुळेंनी ज्या ठिकाणी आंदोलन सुरु केलंय, त्या पोलीस ठाण्यातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी.