Pune : PMPML तिकीट दरवााढीचा निर्णय रद्द; तर मासिक पासच्या दरात कपात : Mayor Murlidhar Mohol
संचालक मंडळाच्या (बीओडी) गुरुवारी झालेल्या बैठकीत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने दैनिक आणि मासिक बस पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. नवा नियम 7 सप्टेंबरपासून लागू होईल.
दुसरीकडे पीएमपीएमएल प्रशासनाचा तिकीट दर वाढवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मोहोळ यांनी त्यांना पासचे दर कमी करून दरवाढ टाळण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.