PMPL BUS : पीएमपीएल कंत्राटदाराचा अचानक संप, पुण्यातील रस्त्यावर तब्बल 900 बसेस कमी : ABP Majha
PMPMLच्या तब्बल ९०० बसेस आज रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. यामागचं कारण म्हणजे या बसेस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी अचानक संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत.. इंधनाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कुठून द्यायचे, असा सवाल करत या कंत्राटदारांनी संप पुकारला आहे. याचा फटका मात्र सामान्य पुणेकरांना बसतोय. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतेय.