PM Narendra Modi Temple at Pune : पुण्यात मोदी भक्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं

बातमी पुण्यातील मोदी मंदिराची. पुण्यातल्या औंधमध्ये एका मोदी भक्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं आहे. मजूर मुंढे या भाजपा कार्यकर्त्यानं स्वतःच्या मालकीच्या जागेत हे मंदिर उभारलंय आणि त्यात नरेंद्र मोदी यांचा पुतळाही बसवलाय. पिंपरी चिंचवड इथले मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करून घेतलाय. त्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च केलेत. १५ ऑगस्ट रोजी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. मंदिरासमोर मोदी यांच्यावर केलेली कविता भक्तांसाठी लावण्यात आलीय. मोदी भक्तानं उभारलेलं हे मंदिर पुण्यात सध्या चर्चेचा विषय ठरलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola