PM Modi Full Speech Pune : पुण्यात शरद पवारांवर पहिला हल्ला, नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण

Continues below advertisement

PM Modi Full Speech Pune : पुण्यात शरद पवारांवर पहिला हल्ला, नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण  राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रांमध्ये धडाका लावलाय. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरु केल्यात. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय.   देशातील दुसऱ्या क्रमांकांचं सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे भाजपच्या 400 पार च्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचं. म्हणूनच की काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावलाय.  ज्या मतदारसंघात भाजपला आव्हान वाटतंय त्या मतदारसंघात भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सभा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपकडून राज्यात एका महिन्यात मोदींच्या 16 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी काही ठिकाणी सभा झाल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram