Pm Modi In Pune : नरेंद्र मोदींच्या सभेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर ABP Majha

बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. एकूण ३३ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी पुणे मेट्रो आराखड्याची पाहणी केली. यानंतर मोदींनी मेट्रोचं मोबाईल तिकीट काढलं. महामेट्रोच्या नव्या अॅल्युमिनियम निर्मित वजनाने हलक्या कोचमधून गरवारे कॉलेज ते आनंदनगर दरम्यान पुणे मेट्रोतून मोदींनी प्रवास केला. यावेळी शाळकरी विद्यार्थी आणि दिव्यांगांसोबत मोदींनी संवाद साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola