Ajit Pawar On PM Modi : महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य टाळली पाहिजे : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केलेल्या राज्यपालांच्या अप्रत्यक्ष तक्रारीची...  महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य टाळली पाहिजे असं अजित पवार एमआयटी महाविद्यालयातील कार्यक्रमात म्हणाले. थोडक्यात अजित पवारांनी,  राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलं आणि त्यानंतर राज्यात वादंग उठलं....राज्यपालांनी नंतर स्पष्टीकरणही दिलं. या प्रकरणाचे अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी  पडसादही उमटले... आणि आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांनी याच मुद्द्यावर बोट ठेवण्याची संधी साधली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola