पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीनं प्रेमविवाह केला म्हणून वाहनांची तोडफोड; 12 वाहनांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड शहर आणि वाहनांची तोडफोड हे समीकरण तसं गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. फक्त या तोडफोडीमागचं कारण बदलत राहतं. कधी दोन गटातील भांडणातून, कधी वर्चस्वासाठी तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. पण आजचं कारण हे धक्कादायक आहे. बहिणीने प्रेम विवाह केला, या रागातून अल्पवयीन भावाने बारा वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक तर एकास ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement