Maratha Reservation | खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर करणार : खासदार उदयनराजे
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे इशारा देत खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे की, आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.