PCMC Exam Copy Case : पिंपरी चिंचवड पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिकमध्ये परीक्षा झाली. यावेळी अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहुल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेराने प्रश्नपत्रिकेचे फोटो अर्जुन राजपूत या साथीदाराला पाठवले. त्यानंतर ब्लु टूथ एअरफोनने उत्तरेही मिळवली. हा प्रकार उघडकीस येताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली. आणि पोलिसांनी डमी परीक्षार्थी राहुल नागलोथ याला अटक केली.