Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?

Continues below advertisement

बारामतीकरांचं जसं शरद पवार साहेबांवर प्रेम आहे, तसंच माझं ही आहे. असं म्हणत दस्तुरखुद्द अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घड्याळाच्या हाताने तुतारी फुंकण्याचे जणू आदेशच दिले. हे पाहून बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महाविकासआघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरु झाली. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांनी आधीचं प्रस्ताव पाठवलाय. पण यावर शिक्कामोर्तब होण्याआधीचं पिंपरी चिंचवड मविआने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली अन काहीही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही. असं ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून जणू बजावूनचं घेतलं. कोल्हापुरातचं काय तर राज्यात कुठं ही पवार काका-पुतणे एकत्र आले तरी पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही हा प्रयोग मुळीच करणार नाही. हवं तर हे शरद पवार गटाला आमच्यादेखत विचारा. असं ठणकावत ठाकरे सेना आणि काँग्रेसने पवार काका-पुतण्यांच्या आघाडीत बिघाडी करण्याचं स्पष्ट संकेत दिलेत. मात्र विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसची आघाडी होऊ शकते, हा इतिहास पाहता उद्या काहीही होऊ शकतं. असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडे लावून धरलाय. पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग धरल्यानंतर, मविआच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटले हे जाणून घेतलंय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola