Pimpari Chinchwad Bunglow : नदीपात्रातील बेकायदेशीर बंगले जमीनदोस्त, रहिवाशांचे अधिकाऱ्यांवर आरोप

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत, 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. आज या बंगल्यांच्या तोडकामाला महानगरपालिकेने प्रारंभ केला.

पालिकेच्या पथकांनी अनेक बुलडोझर आणून एकाचवेळी 29 बंगल्यांच्या तोडकामाला प्रारंभ केला.

या तोडकामामुळे चिखली परिसरात उद्ध्वस्त झालेले बंगले दिसत आहेत. हे दृश्य गाझा पट्टीतील उद्ध्वस्त इमारतींसारखे दिसत आहे.

रिव्हर व्हीला प्रोजेक्ट मध्ये एकूण 36 बंगले आहेत. पैकी 29 रहिवाशी न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले, त्यामुळं आता या प्रोजेक्ट मधील 36 ही बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे.

सकाळी 8 पर्यंत 25 टक्के काम ही पूर्ण झालं आहे. उर्वरित 75 टक्के काम आजचं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola