ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2025
अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा, शिंदेंनी अमित शाहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती, राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन
अमित शाह दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली, संजय राऊतांचा आरोप... अरुण जेटलींनीही शाहांना समजवायचा प्रयत्न केल्याचा दावा
एक वेळ भाजप राहणार नाही पण भारतात काश्मिर नक्की राहणार, संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य..वैचारिक विरोध असला तरी पंतप्रधानांसोबत असा निर्वाळा...
शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण, पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या, आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत मागितली १ कोटींची खंडणी
खासदारांच्या शिष्टमंडळावरुन काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी, सरकारनं निवडलेल्या थरुर यांच्या नावावर काँग्रेसची फुली तर सरकार म्हणतंय नावं आम्हीच निवडणार...