Pimpri Chinchwad : 300 कोटींच्या बिटकॉईनसाठी अपहरण, पोलीस शिपायासह 8 आरोपींना बेड्या

Continues below advertisement

पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी. ३०० कोटींचं बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय..यात पोलिसानं गुन्हेगाराचीच मदत घेतल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस शिपाई दिलीप खंदारेसह ८ आरोपींना गजाआड केलंय. विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे ३०० कोटींची बिटकॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे अशी माहिती विनय खंदारेला मिळाली होती..एका सायबर गुन्ह्याचा तपास करताना त्याला ही माहिती मिळाली होती. त्यानंतर आपण मालामाल होऊ, असं त्याला वाटू लागलं होतं... यासाठी खंदारेनं विनयचं अपहरण करण्याचा कट रचला. पोलीस शिपाई खंदारेनं प्रदीप काटे या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि आणखी काही जणांना सोबत घेतलं..त्यानंतर ताथवडे गावातल्या एका हॉटेलमधून विनय नाईकचं अपहरण करण्यात आलं..पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत ८ आरोपींना गजाआड केलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram