Pimpri : सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून 8 वर्षीय चिमुकल्याची हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुण्याजवळ पिंपरी चिंचवडमध्ये एका आठ वर्षीय मुलाची हत्या झाली. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून अज्ञातानं ही हत्या केल्याचं समोर आलंय. लक्ष्मण देवासी असं या मुलाचं नाव आहे. लक्ष्मण रविवारपासून घरातून बेपत्ता होता. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अखेरीस लक्ष्मणचा मृतदेह घरापासून अवघ्या 100 मीटरवर आढळून आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola