Pune Metro Coach पिंपरीत येताच मानापमान नाट्य, मेट्रो अधिकारी-महापौर उषा ढोरेंमध्ये वाद | ABP Majha
बातमी पुणे मेट्रोवरून रंगलेल्या मानापमान नाट्याची...नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले, त्यावेळी कोचेसवरील कागद न हटवताच महापौर उषा ढोरेंना पूजन करायला सांगितलं, मात्र याबाबत महापौरांना कोणतीच कल्पना नसल्यानं त्यांचा गोंधळ उडाला. या मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नाही, मेट्रो प्रशासनानं समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर मेट्रोची चाचणीच होऊ देणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला. या सर्व प्रकारात महापौरांना तासभर ताटकळत उभं राहावं लागलं, त्यामुळे त्या चांगल्याच संतापल्या.