Lockdown | पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना परवानगी, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्याशी बातचीत
तब्बल पन्नास दिवसानंतर पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक कंपन्या सुरु करण्याची अखेर परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लघुउद्योजक आता तयारीला लागलेत. शहरात अकरा हजार कंपन्या आहेत, पैकी कंटेन्मेंट झोनमधील कंपन्या वगळण्यात आल्यात. याबाबतची नियमावली आज तयार केली जाती आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.