Pune Pimpari : पुणे आणि पिंपरी शहरातील बघतोय रिक्षावाला संघटने तर्फे रिक्षा बंदची हाक : ABP Majha
पुणे आणि पिंपरी शहरातील बघतोय रिक्षावाला संघटने तर्फे रिक्षा बंदची हाक देण्यात आलीय.. शहरात सुरू असलेली बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी सर्विस बंद करण्यात यावी या मागणीसाठी रिक्षाचालकांचं आंदोलन सुरू आहे..हे आंदोलन पुण्यातल्या आरटीओसमोर रिक्षावाला संघटनेनं सुरु केलंय.. अनधिकृत टॅक्सी आणि बाईक सर्व्हिसविरोधात हे आंदोलन करण्यात येतंय. दरम्यान या आंदोलनामुळं पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक विस्कळीत झालीय. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षाचालकांनी हे आंदोलन पुकारलंय..