Pune : पुण्याच्या लक्ष्मीरोड आणि तुळशीबागेत पार्किंगचा प्रश्न मिटला, पाहा कुठे कराल तुमची गाडी पार्क

पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग या परिसरात कपड्याचे दुकान सोन्याच्या दागिन्यांची दुकाने महिलांच्या ज्वेलरीची दुकान व इतर खरेदीसाठी मोठे बाजारपेठ आहे . त्यामुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते आणि वाहन पार्किंग ला लावायची कुठे याचाच प्रश्न भेडसावत असतो. नाहीतर पार्किंग शोधण्यात तासान तास घालवावे लागतात. यासाठी तुळशीबाग व्यापारयांनी पार्किंग हब’ नावाचे अँप विकसित केले असून, अपच्या साह्याने तुळशीबाग व्यापारी असोसिएशनने नागरिकांना घरातूनच ऑनलाइन पार्किंगचा स्लॉट उपलब्ध करून दिला आहे. जोगेश्‍वरी गल्लीतील महालक्ष्मी मेट्रो या सोसायटीची पार्किंग या ॲपद्वारे जोडली गेली असून, या ठिकाणी 200 दुचाकी व 15 चारचाकी पार्क करण्याची व्यवस्था आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola