Mumbai-Pune Expressway :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक तासाचा वाहतूक ब्लॉक : ABP Majha
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी आज एक तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईच्या दिशेने ढेकू गाव इथे दुपारी दोन ते तीन या वेळेत हे काम करण्यात येईल. या कालावधीत दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.