पुण्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध आणखी कडक करण्याच्या प्रशासनाला सूचना : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुण्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येईल. त्यामुळे निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. परंतु पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत कोणतंही भाष्य त्यांनी केलेलं नाही. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा, ऑक्सिजन ऑडिट तसंच फायर ऑडिट याबाबत चर्चा झाल्याचं पवार यांनी सांगितलं.