आमदार, खासदारांना अडवा, घराबाहेर पडू देऊ नका, मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर उदयनराजेंचं वक्तव्य
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही असा सवाल उपस्थित करत नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असे आवाहन मराठा समाजाला केलं आहे.
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Udayanraje Bhosale Maratha Aarakshan