Nilesh Lanke On EVM Video : EVM मध्ये छेडछाड निलेश लंके यांच्याकडून व्हिडिओ व्हायरल! ABP Majha

Continues below advertisement

Nilesh Lanke On EVM Video : EVM मध्ये छेडछाड निलेश लंके यांच्याकडून व्हिडिओ व्हायरल! ABP Majha  ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाभावर अनोखळी व्यक्ती
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात एक अनोळखी व्यक्ती आढळून आला आहे...संबंधित व्यक्ती हा सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निलेश लंके गटाने केला आहे...विशेष म्हणजे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर लंके यांचे कार्यकर्ते देखील लक्ष ठेऊन आहेत...त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता, त्याने आपण तांत्रिक विभागातील असल्याची माहिती दिली...मात्र, गोदामाच्या बाहेरील केंद्रीय सुरक्षा विभाग, राज्य सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कसा? असा सवाल लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे...संबंधित व्यक्ती रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्या परिसरात आल्याची माहिती देण्यात आलीये...त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून या निमित्ताने ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या सुरक्षेबाबत लंके समर्थ कांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे...याबाबत प्रशासनाकडून अधिकृत अशी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही...याबाबत मविआ उमेदवार निलेश लंके यांनी स्वतः हा व्हिडीओ आपल्या एक्स खात्यावरून पोस्ट केला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram