NIA Raids Bhiwandi : एनआयएची भिवंडीतील पडघा येथे अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी
एनआयएची भिवंडीतील पडघा येथे अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी, पुण्यामध्ये आयसिसचे जे दहशतवादी पकडले होते, त्याच प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. अकीब नाचनला एनआयएनं ताब्यात घेतलं आहे . अकीब नाचनने जुल्फिकार अली बरोडावाला आणि झुबेर नूर मोहम्मद शेख या दोन आरोपींना भाड्याने फ्लॅट मिळवून देण्यासाठी आणि तेथे राहण्यास मदत केली होती. नचन यांना एनआयएने ताब्यात घेतले असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.